काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल
काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल

काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल

sakal_logo
By

पालघर, ता. २८ (बातमीदार) : काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. बाबासाहेब आंबेडकर व इतर सदस्यांनी संविधानाची निर्मिती केली. देश संविधानावर चालत आहे. काँग्रेसने निर्माण केलेल्या ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत; मात्र धनाड्य उद्योगपतींची कर्जे माफ केली जात आहेत. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे राज्य येईल, असा विश्वास पालघर येथील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पालघर येथे काँग्रेस संकुलात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालघर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील प्रभारी, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे यशवंत सिंग ठाकूर, किसान सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पराग पष्टे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अवित राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. डी. तिवारी, चंद्रकांत पाटील, दिवाकर पाटील, सिकंदर शेख, तालुका अध्यक्ष मनोहर दांडेकर आदी प्रमुख काँग्रेसने ते उपस्थित होते.