Mon, Jan 30, 2023

वसई कला-क्रीडा महोत्सवा उत्साहात प्रारंभ
वसई कला-क्रीडा महोत्सवा उत्साहात प्रारंभ
Published on : 28 December 2022, 12:08 pm
वसई, ता. २८ (बातमीदार) : साहसी खेळातून आपल्यातील कला व क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी वसई कला-क्रीडा महोत्सवात हजारो स्पर्धकांनी विविध खेळांत सहभाग घेतला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील नागरिकदेखील वसईत गर्दी करू लागले आहेत. बॉक्सिंग, कबड्डी, खो-खो, धावणे, कराटे, व्हॉलीबॉल यासह विविध स्पर्धा वसईच्या चिमाजी आप्पा मैदानावर सुरू आहेत. त्याचबरोबर रांगोळीसह निबंध लेखन, चित्रकला व अन्य स्पर्धादेखील घेण्यात येत आहेत. त्यामुळे वसई तालुक्यातील स्पर्धकांना चांगला वाव मिळत आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे.