Sun, Jan 29, 2023

वसईत रस्त्यावर प्लास्टिकचा खच
वसईत रस्त्यावर प्लास्टिकचा खच
Published on : 28 December 2022, 12:53 pm
वसई, ता. २८ (बातमीदार) : वसई-विरार शहरात प्लास्टिकवर बंदी असली तरी बेसुमार प्लास्टिकचा खच रस्त्यावर दिसून येत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला राडारोडा टाकला जात आहे. महापालिकेने अशा प्रकारावर कारवाईचा इशारा दिला असला तरी असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. वसई, नालासोपारा, विरार भागात महापालिकेने शहराच्या सुशोभिकरणाकडे लक्ष वळवले आहे. सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर आकर्षक चित्र रेखाटली जात आहेत. याचबरोबर नवे उपक्रम हाती घेतले जात आहेत; परंतु शहरात होणारी अस्वच्छता, पर्यावरणास घातक ठरणारे प्लास्टिक हद्दपार करण्यास पालिकेला अपयश येत आहे. त्याचबरोबर बांधकामातून निघणारा राडारोडादेखील ठिकठिकाणी प्रशासनाला आव्हान देत आहे.
------------
वसई : शहरात रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत प्लास्टिक आणि राडारोडा फेकला जात आहे.