Wed, Feb 8, 2023

सराईत गुन्हेगाराला अटक
सराईत गुन्हेगाराला अटक
Published on : 28 December 2022, 12:40 pm
सराईत गुन्हेगाराला अटक
अंधेरी, ता. २८ (बातमीदार) ः मालाड परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका गुन्हेगाराला दिंडोशी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. निहाल निसार शेख (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर चोरी आणि घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री उशिरा पोलिस उपनिरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे आपल्या पथकासह परिसरात गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक स्क्रू ड्रायव्हर आणि पक्कड जप्त केले आहे. त्याच्याविरुद्ध दिंडोशी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.