Mon, Jan 30, 2023

कर्जत यार्ड मॉडिफिकेशनसाठी उद्या ब्लॉक
कर्जत यार्ड मॉडिफिकेशनसाठी उद्या ब्लॉक
Published on : 28 December 2022, 1:15 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड मॉडिफिकेशनच्या कामासाठी शुक्रवारी (ता. ३०) विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल होणार आहेत. त्यात काही उपनगरीय लोकल सेवाही रद्द असणार आहेत. लोणावळा घाट विभाग ते कर्जत स्थानकादरम्यान शुक्रवारी सकाळी १०.४५ ते दुपारी १२ पर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमधील घाट विभागात आणि कर्जतपर्यंत यार्ड मॉडिफिकेशन करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत ट्रेन क्र. २२७३१ हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस आणि ११०१४ कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस गंतव्य स्थानी २० ते ६५ मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. तसेच कर्जतहून सकाळी १०.४० वाजता सुटणारी खोपोली आणि ११.२० वाजता खोपोली येथून सुटणारी कर्जत लोकल रद्द होणार आहे.