८० लाखांच्या बनावट नोटा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

८० लाखांच्या बनावट नोटा जप्त
८० लाखांच्या बनावट नोटा जप्त

८० लाखांच्या बनावट नोटा जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पवई येथे कारवाई करून ५०० रुपयांच्या १६ हजार बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी सौजन्य पाटील नावाच्या ३१ वर्षीय आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. बनावट नोटा ८० लाख रुपये किमतीच्या आहेत.
भारतीय बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पवई येथील साकीविहार परिसरातील आंबेडकर गार्डनजवळ पोलिसांनी सापळा रचला. त्या वेळी एक संशयित व्यक्ती दुचाकीवरून तेथे आली. ती व्यक्ती लाल रंगाच्या बॅगेसह तेथे संशय्तरीत्या वावरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याजवळील बॅग तपासली असता त्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे आढळून आले. पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.