भिवंडीतील पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीतील पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान
भिवंडीतील पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान

भिवंडीतील पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान

sakal_logo
By

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडीतील श्री साई सेवा संस्थेच्या वतीने सेवाभावी कार्यात निस्वार्थी भावनेने सहकार्य करणाऱ्या पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान सोहळा कल्याण नाका या ठिकाणी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती सिंह यांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी भिवंडी शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनीष पाटील व शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर इंदलकर, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी महेंद्र गायकवाड, बाळकृष्ण रेड्डी, स्वयंसिद्धी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील दुर्बल व दुर्लक्षित महिला तसेच देहविक्री करणाऱ्या महिलांना सामाजिक सन्मान व शासकीय योजना मिळवून देण्याचे काम श्री साई सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून कोरोना संकटात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती सिंह यांनी उपस्थितांना दिली. शहरातील पत्रकारांनी कोरोना काळापासून मागील दोन वर्षात संस्थेच्या केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेचे कार्य समाज समोर मांडल्याने त्याची दखल सरकारी यंत्रणेने सुद्धा घेतली. त्यानिमित्त संस्थेच्या वतीने शहरातील पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला.