Mon, Feb 6, 2023

खानीवलीच्या उपसरपंचपदी रुपाली मारुख
खानीवलीच्या उपसरपंचपदी रुपाली मारुख
Published on : 29 December 2022, 12:49 pm
पडघा, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या खानिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली मारुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खानिवली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नागरिकांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडून थेट जनतेमधून सरपंच म्हणून निकिता दळवी, तर सात ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानुसार अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक कमळाकर कुरकुरे यांच्या उपस्थितीत एक खास सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी रुपाली मारुख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी सचिव म्हणून ग्रामसेविका जागृती धलपे यांनी काम पाहिले.