२४ बेवारस, भंगार वाहनांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२४ बेवारस, भंगार वाहनांवर कारवाई
२४ बेवारस, भंगार वाहनांवर कारवाई

२४ बेवारस, भंगार वाहनांवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत तीन प्रभागातील २४ बेवारस, भंगार वाहनांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरील रहदारीतून ये जा करणे सोपे व्हावे, या दृष्टिकोनातून रस्त्यावरील बेवारस, भंगार वाहने हटविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये सातत्य नसल्याने रस्त्यावर अनेक वाहने बेवारस स्थितीत पडून आहेत. या वाहनांवरील कारवाई पालिका प्रशासनाने सुरू केली असून, मंगळवारी टिटवाळा, डोंबिवली आणि कल्याण पूर्व अशा तीन प्रभागात २४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. टिटवाळा स्टेशन परिसरातून तीन चारचाकी व पाच दुचाकी, डोंबिवली पूर्वेतून नऊ दुचाकी व एक चारचाकी, कल्याण पूर्वेतून तीन दुचाकी व दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा करुन ठेवण्यात आली आहेत.