नवीन वर्षात तळोजाकरांची टॅंकरमुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन वर्षात तळोजाकरांची टॅंकरमुक्ती
नवीन वर्षात तळोजाकरांची टॅंकरमुक्ती

नवीन वर्षात तळोजाकरांची टॅंकरमुक्ती

sakal_logo
By

खारघर, ता.२९ (बातमीदार): खारघरनंतर तळोजा वसाहत निर्माण करणाऱ्या सिडकोने जलकुंभ उभारणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तळोजा वसाहतीमधील जवळपास तीस सेक्टरमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोकडून प्रत्येकी पाच एमएलडी क्षमतेचे दोन जलकुंभ तयार उभारण्यात आले असून नवीन वर्षात तळोजा वसाहत टॅंकरमुक्त होणार आहे.
सिडको वसाहतीत सिडकोने एमआयडीसीकडून आठ एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना सिडकोकडून पुरवल्या जाणाऱ्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तर काहींना बाहेरून टँकरने पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत होत्या. त्यामुळे तळोजा वसाहतीतील फेज एक आणि दोनमधील ३० सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या पाणी समस्येविरोधात अनेकदा रहिवाशांनी मोर्चे आंदोलने केली होती.
-------------------------------
सतरा कोटींचा खर्च
सिडकोने सतरा कोटी रुपये खर्च करून तळोजा फेज एक सेक्टर ८ प्लॉट न.१२ आणि सेक्टर २४ फेज दोन प्लॉट न १३ बी ए या दोन भूखंडावर प्रत्येकी पाच एमएलडी क्षमतेचे दोन जलकुंभ स्वतंत्र जलकुंभ उभारणीचे काम जानेवारी महिन्यात सुरु केले होते. या दोन्ही जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करून मार्च महिन्यापासून वसाहतीत जलकुंभातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता त्या भागातील पाणी समस्या दूर होणार आहे.
-----------------------------------------------
तळोजा फेज एक आणि दोन वसाहतीत अनेक वर्षांपासून पाणी समस्या होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विषयी सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. सिडकोने वेळेत जलकुंभ उभारणी केल्यामुळे तळोजा वसाहतीमधील पाणी समस्या दूर होणार आहे.
-नवनाथ पाटील, सरचिटणीस, पनवेल ग्रामीण मंडळ भाजप