अंबरनाथमध्ये महिला भजन स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथमध्ये महिला भजन स्पर्धेचे आयोजन
अंबरनाथमध्ये महिला भजन स्पर्धेचे आयोजन

अंबरनाथमध्ये महिला भजन स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २९ (बातमीदार) : गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज सेवा मंडळातर्फे महिलांसाठी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक महिला भजनी मंडळाने यात सहभाग घेऊन भजन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार दलाल आणि सरचिटणीस बळीराम साबे यांनी केले आहे. ९ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धा होणार आहे. विजेत्या भजनी मंडळांना तीन हजार, दोन हजार, एक हजार आणि सन्मानचिन्ह अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. ६ जानेवारीपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.