दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ
दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ

दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ (बातमीदार) ः मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंबशुल्कासह परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत संपुष्टात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अतिविलंब शुल्क आकारून परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारण्याबाबत विभागीय मंडळांना आदेश दिले आहेत.
आवेदन पत्र सादर करण्याची निर्धारित मुदत संपल्यामुळे श्रेणी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी ३० दिवसांचा कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे अतिविलंब शुल्कासह २० जानेवारीपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात येतील; तर विशेष अतिविलंब शुल्कासह (१०० रुपये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी) २१ जानेवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान स्वीकारण्यात येतील; तर अतिविशेष अतिविलंब शुल्कासह (२०० रुपये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी) १ मार्चपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. ही आवेदनपत्रे संबंधित माध्यमिक शाळेने शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर भरावयाची आहेत, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.