Tue, Feb 7, 2023

आनंदवन भक्तनिवास लोकार्पण सोहळा
आनंदवन भक्तनिवास लोकार्पण सोहळा
Published on : 29 December 2022, 1:17 am
खर्डी, ता. २९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील सरळाबे येथील मारुती मामा ट्रस्टच्या वतीने प्रेममूर्ती संतश्री सुभाषमामा दीक्षित यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त २७ डिसें ते १ जानेवारीदरम्यान भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदवन भक्त निवास लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सरळाबे येथील वानप्रस्थ उपासना क्षेत्र येथे श्रीकृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने उद्योजक शिवजीशेठ अधिकारी यांनी केले आहे.
या सोहळ्यात हभप जगन्नाथ महाराज पाटील यांच्या सुमधुर वाणीने श्रीकृष्ण कथा होणार आहे. तसेच या कथेत गोकुळीचा सखा, वृंदावनी वेणू, मथुरेचा राजा, गीता सांगे हरी व द्वारकेचा राजा आदी भाग होणार आहेत. १ जाने रोजी हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.