Thur, Feb 2, 2023

नारायणगाव शाळा इमारतीसाठी २२ लाखांचा निधी
नारायणगाव शाळा इमारतीसाठी २२ लाखांचा निधी
Published on : 29 December 2022, 11:44 am
किन्हवली, ता. २९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील नारायणगाव जिल्हा परिषद शाळेच्या नव्या शाळा इमारतीसह एका वर्गखोलीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे यांच्या प्रयत्नाने यासाठी २२ लाख ५० हजारांचा निधी मंजूर झाला असून इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. नारायणगाव शाळेच्या वर्गखोल्या खूप जुन्या असल्याने मोडकळीस आल्या आहेत. यापैकी एका वर्गखोलीला दुरुस्तीची गरज होती. इमारत भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, उपतालुकाप्रमुख बाळू वरकुटे, शिवसेना विभागप्रमुख दीपक लकडे, सरपंच काळूराम उघडा, उपसरपंच राजेश शिर्के, केंद्रप्रमुख विलास वेखंडे, मुख्याध्यापक दशरथ विशे आदींसह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.