Mon, Jan 30, 2023

डहाणूत रतन टाटा यांचा वाढदिवस साजरा
डहाणूत रतन टाटा यांचा वाढदिवस साजरा
Published on : 29 December 2022, 1:22 am
डहाणू, ता. २९ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय उद्योगपती रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त डहाणूतील के. एल. पोंदा हायस्कूलच्या भव्य मैदानात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांने रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित चलचित्रातून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी टाटांच्या सुंदर प्रतिमांचे रेखाटन करून शुभेच्छा दिल्या. सहशिक्षिका मनीषा गोसावी यांच्या पुढाकाराने व भारतीय पॅरा कबड्डी असोसिएशनचे आंतराष्ट्रीय कबड्डीपटू, राष्ट्रीय उपकर्णधार सचिन तांडेल, मुख्याध्यापक रवींद्र बागे आणि पर्यवेक्षक सुनील मोरे यांच्या हस्ते सर्व बालचित्रकार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.