Wed, Feb 1, 2023

गांजा विक्रीप्रकरणी महिला ताब्यात
गांजा विक्रीप्रकरणी महिला ताब्यात
Published on : 29 December 2022, 12:47 pm
नवी मुंबई (वार्ताहर) : एपीएमसीतील कोपरी गावात राहत्या घरातून गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतले आहे. विमल राठोड (६७) असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून ९ हजारांचा गांजा जप्त केला आहे.
कोपरी गावात एक महिला आपल्या राहत्या घरातून गांजाची विक्री करीत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत कोपरी गावातून विमल राठोड या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिची झडती घेतली, तिच्याकडे १७८ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे.