Wed, Feb 8, 2023

विद्यार्थ्यांना सतरंजीचे वाटप
विद्यार्थ्यांना सतरंजीचे वाटप
Published on : 29 December 2022, 11:19 am
मनोर, ता. २९ (बातमीदार) : दहिसरतर्फे मनोर गावातील नोक्ती पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत कापडी सतरंज्या उपलब्ध करून देण्यात आल्या. गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य साजिद शेख आणि सरपंच अंकिता भोईर यांच्या हस्ते या कापडी सतरंज्या नोक्ती पाड्यातील विद्यार्थ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. नोक्ती पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना फरशी वर बसावे लागत होते. विद्यार्थ्यांची गैरसोय ग्रामपंचायत सदस्य साजिद शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने कापडी सतरंज्या खरेदी करूम शाळेच्या विद्यार्थ्यांना भेट दिल्या.