Fri, Feb 3, 2023

‘श्रीकृष्णनगरचा बंद पूल तत्काळ सुरू करावा’
‘श्रीकृष्णनगरचा बंद पूल तत्काळ सुरू करावा’
Published on : 29 December 2022, 11:43 am
मुंबई, ता. २९ ः गेल्या अनेक महिन्यांपासून नॅशनल पार्क शेजारचा श्रीकृष्ण नगर येथील पूल बंद असल्याने लोकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे महापालिकेने या पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
हा पूल दुरुस्तीसाठी तोडण्यात आला आहे, मात्र त्याचे काम त्वरेने पूर्ण होत नाही. सध्या श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, काजूपाडा येथील लोकांना लांबचा वळसा घेऊन बोरीवली गाठावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम, पैसा वाया जातो, असेही दरेकर यांनी दाखवून दिले. त्यावर महापालिकेला यासंदर्भात योग्य ते आदेश दिले जातील, असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले.