Mon, Feb 6, 2023

कळव्यात आगीत तीन संगणक, एसी खाक
कळव्यात आगीत तीन संगणक, एसी खाक
Published on : 29 December 2022, 1:02 am
कळवा, ता. २९ (बातमीदार) : कळवा मनीषा नगर येथील एका बांधकाम विकासकाच्या कार्यालयात लागलेल्या आगीत तीन संगणक, एसी युनिट व एक लाकडी टेबल जळाले. ही घटना गुरुवारी (ता. २९) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. मनीषा नगर गेट क्रमांक दोनजवळ एका बांधकाम विकासकाचे वास्तुशिल्प नावाचे कार्यालय आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक शॉकसर्किटमुळे कार्यालयात आग लागल्याने कार्यालयातील तीन संगणक, एसी युनिट व एक लाकडी टेबल जळून खाक झाले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी व टोरंट वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वीजप्रवाह खंडित केला. यानंतर अग्निगशमन दलाच्या जवानांना पाचारण केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेत कोणीही जखमी झाले नाहीत.