एक अंकी रुग्णसंख्येची पुन्हा नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक अंकी रुग्णसंख्येची पुन्हा नोंद
एक अंकी रुग्णसंख्येची पुन्हा नोंद

एक अंकी रुग्णसंख्येची पुन्हा नोंद

sakal_logo
By

पालिकेच्या अनेक प्रभागांत
पुन्हा कोविड रुग्णांची नोंद
सात दिवसांत १८ बाधित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत कोविड आजाराला उतरती कळा लागली असे वाटत असतानाच पुन्हा रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आठवडाभरापूर्वी नऊ वॉर्डांमध्ये एकाही बाधिताची नोंद झाली नव्हती. दरम्यान, कोविड प्रकरणांच्या जागतिक वाढीमुळे नऊपैकी सात वॉर्डांमध्ये गेल्या सात दिवसांत एकूण १८ नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत. गेल्या आठवडाभरात पाच वॉर्डांमध्ये एकाही प्रकरणाची नोंद झाली नव्हती.

पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहरात कोरोना रुग्ण कधी वाढू शकतात ते सांगण्याचा कोणताही पर्याय नाही. नवीन लाटेत आढळणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यास त्यांची पूर्ण तयारी झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१२ डिसेंबर रोजी नोंद केलेल्या कुर्ला (एल वॉर्ड), कांदिवली (आरएस वॉर्ड), भायखळा (ई वॉर्ड), कुलाबा (ए वॉर्ड), चेंबूर पूर्व (एम-पूर्व), बोरिवली (आर-मध्य), मरीन लाइन्स (सी वॉर्ड), चेंबूर पश्चिम (एम-पश्चिम) आणि गोरेगाव (पी-दक्षिण) मध्ये ४ ते १० डिसेंबरदरम्यान एकही रुग्ण आढळला नाही. पण, आता वरील नऊपैकी कुलाबासारख्या वॉर्डात ६, कांदिवली ४, कुर्ला ३, बोरिवली २ आणि गोरेगाव, भायखळा अन् मरिन लाईन्समध्ये प्रत्येकी १ कोविड रुग्ण आढळला आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर पालिकेच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, की आगामी काही दिवसांत विषाणूची प्रतिक्रिया कशी असेल हे सांगणे फार कठीण आहे. जर जागतिक स्तरावर रुग्णांमध्ये वाढ झाली तर निश्चितपणे त्या नव्या ट्रेंडनुसार माहिती मिळेल. ही परिस्थिती गंभीर असेल किंवा तिसऱ्या लाटेसारखीच असेल हे सांगणे कठीण आहे. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे प्रकरणे नोंदवली गेली आहेत; परंतु तरीही संख्या चिंताजनक नाही. जरी आतापर्यंत कोणतीही वाढ दिसून आली नाही याचा अर्थ असा नाही की धोका आटोक्यात आला आहे. जबाबदारीने वागावे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे.

सध्याचे चित्र
२१ ते २७ डिसेंबरदरम्यान एकही रुग्ण न आढळलेले वॉर्ड ः ५
- माटुंगा (एफ नॉर्थ), सॅण्डहर्स्ट रोड (बी), दहिसर (आर नॉर्थ), चेंबूर (एम पूर्व) आणि चेंबूर पश्चिम (एम पश्चिम) सारख्या भागात एकाही रुग्णाची नोंद नाही.
- २६ डिसेंबरपर्यंत सक्रिय रुग्ण ः ४८
- ४४४१ पैकी केवळ १० खाटांवर रुग्ण
- उर्वरित बेड रिकामी