Thur, Feb 9, 2023

७१ वर्षीय वृद्धेची सुखरूप सुटका
७१ वर्षीय वृद्धेची सुखरूप सुटका
Published on : 29 December 2022, 12:28 pm
ठाणे, ता. २९ (वार्ताहर) : तळ मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा लॉक झाल्याने ७१ वर्षीय वृद्धा अडकल्या होत्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पथकाने दरवाजा तोडून वृद्धेची सुखरूप सुटका केली. ही घटना गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास पालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार ठाणे पश्चिम, मानपाडा येथील इमारत क्रमांक २२ ही ७ माळ्यांची इमारत आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर ७१ वर्षीय जयंती दिवाकर यांचा दरवाजा लॉक झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य करीत फ्लॅटचा दरवाजा तोडून ७१ वर्षीय वृद्धा दिवाकर यांना सुखरूप बाहेर काढले.