शासकिय योजनांचा लाभ घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकिय योजनांचा लाभ घ्या
शासकिय योजनांचा लाभ घ्या

शासकिय योजनांचा लाभ घ्या

sakal_logo
By

वसई, ता. २९ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा म्हणून प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे निराधारांसह अन्य महिला लाभार्थ्यांना हा लाभ घेणे सोईचे जाणार आहे. विविध योजनांची माहितीदेखील महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे ज्या वर्गवारीत लाभार्थी असतील त्यांना लाभ घेता येणार आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील गरीब व गरजुंना अनेक योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यावर्धीनी शैक्षणिक योजनेअंतर्गत विधवा, निराधार, घटस्फोटीत, परितकत्या महिलांची मुले, निराधार बालके, दिव्यांग, कर्णबधीर व मुकबधीर मुले, एचआयव्हीबाधीत पालकांच्या मुलांना, ज्या महिलेचे पती व्याधीग्रस्त असून अंथरुणास खिळलेले आहेत अशा महिलांच्या मुलांना तसेच अनाथ बालकांना शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते.

--------------------------
मतिमंद मुलांच्या देखभालीसाठी अनुदान
कोवीड १९ मध्ये आई किंवा वडील मयत झालेल्या पालकांच्या मुलांना शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते. याचबरोबर आधारमाया योजनेंतर्गत कुष्ठरोगबाधीत पुरुष व महिला, मुले व मुली तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ महिलांच्या उपजिविकेकरिता मासिक अनुदान, उत्तरदायी योजनेअंतर्गत गतीमंद, मतिमंद मुलांच्या देखभालीकरिता मासिक अनुदान, ७५ टक्के अथवा त्याहून अधिक दिव्यांग असणाऱ्याच्या १४ वर्षांखालील मुलांना व सर्व वयोगटातील मुली व महिलांना मासिक अनुदान दिले जात आहे.

-------------------
स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
आरोग्याच्या दृष्टीने महिला, युवक व युवती, ज्येष्ठ नागरिक यांच्या डायलेसीस उपचाराकरिता जीवनदायीनी योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य व कर्करोगबाधीत महिलांच्या उपचाराकरितादेखील वैद्यकिय सहाय्य, महिलांना मेमोग्राफी व पॅप स्मिअर तपासणी अर्थसहाय्य देण्यात येते. वरदायिनी योजनेतून मुलींच्या लग्नाकरिता आर्थिक अनुदान, दत्तक योजनेंतर्गत मुला-मुलींना दत्तक घेतल्यासदेखील महानगरपालिकेमार्फत प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच श्रमसाधना योजनेअंतर्गत ४५ ते ७५ टक्के अंधत्व व अपंगत्व असलेल्या महिलांना स्वयंरोजगार करिता अर्थसहाय्य १८ ते २९ वयोगटातील अनाथ मुलामुलींना उपजिविकेसाठी अर्थसहाय्य. त्यामुळे या योजनांचा लाभ महिलांना घेता यावा म्हणून मुदत वाढ करण्यात आली आहे.

-------------------
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना या योजनांचा लाभ अधिकाधिक संख्येने घेता यावा यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी विविध योजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे. गरजू नागरिकांनी त्यानुसार अर्ज दाखल करावेत.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका