मुब्र्यात आठवडाभरात हत्यांचे सत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुब्र्यात आठवडाभरात हत्यांचे सत्र
मुब्र्यात आठवडाभरात हत्यांचे सत्र

मुब्र्यात आठवडाभरात हत्यांचे सत्र

sakal_logo
By

कळवा, ता. २९ (बातमीदार) ः मुंब्रा परिसरात गेल्या आठवडाभरात हत्येच्या चार घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोऱ्या, घरफोड्या यासारख्या घटना मुंब्रा परिसरात नेहमीच्या आहेत, पण आता हत्येच्या घटनांमुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

भांडण सोडवायला गेलेल्या संनाम खान (वय ३०) यांची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली होती. अख्यतार खान आणि मुस्तफा बागी यांच्यात कोरेक्स सिरप बॉटल परत घेण्यावरून हा वाद झाला होता. यात संनाम यांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्यावर अख्यतार खान आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांनी धारदार शस्त्राने हत्या केली; तर २४ डिसेंबर रोजी रेतीबंदर खाडीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. २७ डिसेंबर रोजी रिझवी बाग पार्किंगजवळ इम्तियाज शेख (वय ३३) यांची हत्या झाली होती. आरोपी सुलतान शेख याला तू पार्किंगजवळ का आलास असे इम्तियाज यांनी विचारले होते. याचा राग मनात ठेवून सुलतान याने सुऱ्याने वार करत इम्तियाजची हत्या केली. त्याच दिवशी मोहम्मद शेख या वाहनाचालकावर बबली नावाच्या व्यक्तीने चाकूने वार केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. २८ डिसेंबर रोजी अमृत नगर येथे अल्पवयीन मुलीने स्वतःच्या आईचीची हत्या केल्याची घटना घडली. सबा मेहंदी हाश्मी (वय३७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या १७ वर्षीय मुलीने आपल्या मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राने आईची हत्या केली. या सर्व प्रकारामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. मुंब्रा पोलिस योग्यरीतीने तपास करत असून यापुढे अशा घटना घडू नयेत याची दक्षता घेतली जाईल, असे सहायक पोलिस आयुक्त विलास शिंदे यांनी सांगितले.