जनशताब्दी एक्स्प्रेसचा अपघात टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनशताब्दी एक्स्प्रेसचा अपघात टळला
जनशताब्दी एक्स्प्रेसचा अपघात टळला

जनशताब्दी एक्स्प्रेसचा अपघात टळला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या एक डब्याचा चाकातील पट्टीला तडा गेल्याची घटना घडली. गाडी तात्काळ मनमाड स्थानकांवर थांबवण्यात आली. त्यानंतर तो डबा काढून तब्बल दोन तासांनंतर जनशताब्दी मुंबईकडे रवाना करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील जालना ते सीएसएमटीदरम्यान दररोज जनशताब्दी एक्स्प्रेस धावते. गुरुवारी जालन्याहून जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी ८.३० वाजता सुटून सकाळी ११ वाजताचा सुमारास नाशिकजवळ येत असताना एक्स्प्रेसचा एका डब्यात चाकातील पट्टीला तडा गेल्याची घटना घडली. रेल्वे कर्मचाऱ्यांना ही घटना लक्षात येताच जनशताब्दी एक्स्प्रेसला तात्काळ मनमाड स्थानकावर सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी थांबवण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने या गाडीतील नादुरुस्त झालेली बोगी हटवण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मनमाड रेल्वे स्थानकात गाडी थांबली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.