वाशी विभागात १ कोटींची वीजचोरी उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशी विभागात १ कोटींची वीजचोरी उघड
वाशी विभागात १ कोटींची वीजचोरी उघड

वाशी विभागात १ कोटींची वीजचोरी उघड

sakal_logo
By

तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : वाशी विभागात एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली आहे. वाशी मंडळातील अधीक्षक अभियंत राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शामकांत बोरसे व त्यांच्या चमूने ही कारवाई केली. अनधिकृत विजेचा वापर केल्यामुळे ५१ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान महावितरणला झाले आहे.

महावितरण भांडुप परिमंडळात वीजचोरी पकडण्याची मोहीम सतत चालू असते. एप्रिल २०२२ ते आतापर्यंत महावितरणच्या वाशी मंडळातील ऐरोली, कोपरखैरणे व वाशी येथील ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत विविध ठिकाणी वीजचोरी तसेच विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे दिसून आले. विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार ३३५ प्रकरणात १ कोटी १७ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली आहे. याशिवाय विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ७२ प्रकरणात ५१ लाख ७० हजार रुपयांचा अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना आवाहन केले, की येत्या काळात सदरची मोहीम अतितीव्रतेने राबवण्यात येणार आहे. म्हणून कोणीही वीजचोरी करून विद्युत कायद्याचे उल्लंघन करू नये; अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.