बार मालकाची ग्राहकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार मालकाची ग्राहकाला मारहाण
बार मालकाची ग्राहकाला मारहाण

बार मालकाची ग्राहकाला मारहाण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : उशिरापर्यंत सुरू असलेल्या एका बारमध्ये बिलाचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात बारमालकाने ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज गिरी हा त्याच्या मित्रासोबत आजदे गाव येथील आशिष बार येथे मंगळवारी (ता. २७) रात्री दारू पिण्यास गेला होता. त्यानंतर अडीच वाजण्याच्या दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीने सूरज याच्या वडिलांना फोन लावत दारूच्या बिलावरून सूरज याचे बार मालकाबरोबर भांडण सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर सूरजचा भाऊ धीरज कुमार आणि त्याचे वडील अमरनाथ गिरी आशिष बारमध्ये पोहोचले. या वेळी सूरज हा बारमध्ये त्यांना खाली पडलेल्या अवस्थेत दिसला. यावर धीरज यांनी बार मालकाला जाब विचारला. तेव्हा मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी धीरज आणि अमरनाथ गिरी यांच्या डोक्यात बिअरची बॉटल मारली. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सध्या सूरज आणि धीरज दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशिष बारच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलिस करत आहेत.