मॉकड्रील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉकड्रील
मॉकड्रील

मॉकड्रील

sakal_logo
By

ठाणे, ता. २९ (वार्ताहर) ः ‘आपदा मित्र’च्या तुकडीचे ठाण्याच्या मासुंदा तलावात गुरुवारी (ता. २९) मॉकड्रील करण्यात आले. बोटीद्वारे बचाव कार्य, पाण्यात सापडलेल्यांना कसे वाचवायचे, पोटात पाणी गेल्यावर ते बाहेर कसे काढायचे याचे प्रशिक्षण या वेळी देण्यात आले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती काळात मदतीसाठी ‘आपदा मित्रां’ची तुकडी तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या मॉकड्रीलचे नियोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पूर आलेल्या ठिकाणी पूर विमोचन बोट घेऊन बचाव कसा करावा, जीवरक्षक कवच कसे घालावे, बचावकार्य करताना कोणती दक्षता घ्यावी, पाण्यातून बचाव केलेल्या व्यक्तीला प्रथमोपचार म्हणून कोणती कृती करावी याचे प्रात्यक्षिकही या वेळी आपदा मित्रांकडून करून घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले; तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख ओमकार वैती, महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनप्रमुख अविनाश सावंत, यशदा येथील मास्टर ट्रेनर अजित कारभारे, आपत्ती विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.