Sat, Jan 28, 2023

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला लागली आग
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला लागली आग
Published on : 30 December 2022, 1:34 am
ठाणे, ता. ३० (वार्ताहर) ः ठाण्याच्या तलावपाळी परिसरातील विद्युत कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिघे टॉवरजवळ, छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोर, तलावपाली, ठाणे (प.) या ठिकाणी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली. घटनास्थळी लागलेली आग महावितरणचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा मिनिटांत विझवली.