मुंबई पोलिसांचे ''ऑपरेशन ऑल आऊट'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिसांचे ''ऑपरेशन ऑल आऊट''
मुंबई पोलिसांचे ''ऑपरेशन ऑल आऊट''

मुंबई पोलिसांचे ''ऑपरेशन ऑल आऊट''

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी फरार, वाँटेड, तडीपार आरोपींना पकडले असून एनडीपीएस कायद्यांतर्गत अमली पदार्थ तस्करांवरही कारवाई केली आहे. याबरोबरच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी २९ डिसेंबरला रात्री ही कारवाई केली.
शहरात २९ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ३० डिसेंबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपेरेशन राबविण्यात आले होते. मुंबई शहरातील सर्व पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, १३ परिमंडळीय पोलिस उपआयुक्त, पोलिस उपआयुक्त विशेष शाखा आणि सुरक्षा, ४१ विभागीय सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात ऑल आऊट ऑपेरेशनची कार्यवाही केली.
मुंबई शहरात २२३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील १४७१ आरोपी तपासण्यात आले. त्यामध्ये २७१ आरोपी मिळून आले. त्यांच्यावर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. १७८ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यामध्ये ८६९० दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली आणि मोटार वाहन कायद्यान्वये २३०० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
रेकॉर्डवरील २९ फरारी आरोपींना अटक केली. अमली पदार्थ विरोधी कायद्याअन्वये १६४ कारवाया करण्यात आल्या. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ३१ जणांवर कारवाया करण्यात आल्या. अवैध दारू विक्री आणि जुगार असा अवैध धंद्यांवर ७३ ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे समूळ उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच इतर अवैध ३८ धंद्यांवर छापे टाकून ५५ आरोपींना अटक करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये तब्बल २,३०० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. ८७२ हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.