भाजप नेत्यावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप नेत्यावर हल्ला
भाजप नेत्यावर हल्ला

भाजप नेत्यावर हल्ला

sakal_logo
By

ठाणे, ता . ३० (वार्ताहर) ः भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात रेपाळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.

प्रशांत जाधव हे काही कामानिमित्त शुक्रवारी (ता.३०) संध्याकाळी काशिश पार्क येथे जात होते. तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. यात जाधव यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला बॅनरबाजीच्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेबांची शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. पण, त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.