
खारघरमध्ये ड्रग्ज साठा जप्त
खारघर, ता.३० (बातमीदार) : थर्टी फर्स्टच्या पूर्व संध्येला खारघरमध्ये गुन्हे शाखेने शुक्रवारी (ता.३०) रात्री मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त केला. या वेळी काही नायझेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
खारघरमध्ये काही नायझेरियन थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्षच्या कार्यालयाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळावर धाड मारली. त्यावेळी लाखो रुपयांचे ड्रग्ज हस्तगत करून दोनपेक्षा अधिक नायझेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणलेले ड्रग्ज कोणासाठी आणण्यात आले, कोठून आणले याचा तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याविषयी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता गुन्हे शाखेने काही व्यक्तींना नुकतेच ताब्यात घेतले असून तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.