कोजबाड येथे क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोजबाड येथे क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन
कोजबाड येथे क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन

कोजबाड येथे क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन

sakal_logo
By

डहाणू, ता. ३१ (बातमीदार) : खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जो विद्यार्थी मैदानात खेळतो त्याचे शरीर व मन सुदृढ राहते. अभ्यासाबरोबरच खेळामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास अचूक ध्येयाकडे निश्चित वाटचाल करण्यास मदत होते. जीवन समृद्ध करण्यासाठी खेळ आवश्यक असून खेळामुळे व्यक्तिमत्व सुधारता येते, असे प्रतिपादन डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कोसबाड केंद्राने आयोजित केलेल्या दोनदिवसीय केंद्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या वेळी व्यासपीठावर अतिथी म्हणून डहाणू पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, घोलवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी सुरेश बनसोडे, मंडळ अधिकारी बांगर तसेच कोसबाड येथील विविध विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक विलास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख शास्त्रज्ञ उत्तम सहाने यांनी; तर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पठाडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नागेश संख्ये, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दुर्गेश मराठे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य प्रसाद कासले, प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका प्रवदा बारी, वाकी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सूर्यवंशी, सुधीर तळेकर, पी. के. पाटील, अनिल कुमार सिंग तसेच आश्रम शाळेचे विविध कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.