डहाणूत पर्यटकांसाठी अपुऱ्या सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत पर्यटकांसाठी अपुऱ्या सुविधा
डहाणूत पर्यटकांसाठी अपुऱ्या सुविधा

डहाणूत पर्यटकांसाठी अपुऱ्या सुविधा

sakal_logo
By

डहाणू, ता. ३१ (बातमीदार) : नवीन वर्ष साजरे करण्यासाठी डहाणूत गेल्या काही दिवसांपासूनच हॉटेल्समध्ये ऑनलाईन बुकिंगचा ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे परगावांतून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी, पार्किंगची व्यवस्था आणि त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर असणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
मागील दोन वर्षांचा कोरोना कालावधी सोडला तर मुंबई उपनगर आणि गुजरात राज्यातील पर्यटक डहाणूत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येथील समुद्र किनारे गजबजलेले असतात. पर्यटकांची वाढती गर्दी आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा या खूपच कमी आहेत.

------------------------------
स्वच्छतागृहे, सुरक्षेचा अभाव
डहाणू शहरातील पारनाका, बोर्डी तसेच डहाणू खाडीपूल, चिंचणी समुद्रकिनारा, वाढवण समुद्रकिनारा अशा चौपाट्यांवर काही ठिकाणी शौचालयांचा अभाव; तर काही ठिकाणी प्रकाशयोजनांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. बहुतेक समुद्रकिनाऱ्यांलगत लोकवस्ती नसल्याने हा परिसर निर्मनुष्य आणि गर्द सुरूची बागांनी वेढलेला असल्यामुळे येथे अंधार पडल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी पोलिसांची गस्त असली तरी सुरक्षा रक्षकांचा अभाव असताना पर्यटक रात्रीपर्यंत किनाऱ्यावर फिरत असतात. काही पर्यटक या काळात मद्यपान करतात, काही पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरत असतात, त्यांना स्थानिक भरती-ओहोटीच्या वेळा याची काहीच जाणीव नसल्याने अनेक अपघात घडत असतात.