गुरुनानक हायस्कूलमध्ये विद्यार्थांची आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुनानक हायस्कूलमध्ये विद्यार्थांची आरोग्य तपासणी
गुरुनानक हायस्कूलमध्ये विद्यार्थांची आरोग्य तपासणी

गुरुनानक हायस्कूलमध्ये विद्यार्थांची आरोग्य तपासणी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ३१ (बातमीदार) : गुरुनानक इंग्लिश हायस्कूल सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक प्रगती बरोबरच सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहणं खूप महत्त्वाचे आहे. यासाठी गुरुनानक इंग्लिश हायस्कूलमध्ये वैभव मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल, कल्याण यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य संबंधित माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे योग्य निदान व्हावे व निरोगी आयुष्य त्यांना लाभावे यासाठी गुरुनानक शाळेचेच माजी विद्यार्थी वैभव हॉस्पिटलचे डॉ. वैभव गोरडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी उत्कृष्टरीत्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना, पालकांना या संबंधात माहिती देण्यात आली आणि पुढील उपचार घेण्यास सांगण्यात आले. १४५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या वेळी करण्यात आली.