Wed, Feb 1, 2023

चोंढे बु. ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण
चोंढे बु. ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण
Published on : 31 December 2022, 12:30 pm
किन्हवली, ता. ३१ (बातमीदार) : डोळखांब जिल्हा परिषद गटातील चोंढे बु. येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या संगीता गांगड यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच हैबत पडवळ यांनी पत्नी कै. ताराबाई पडवळ हिच्या स्मरणार्थ चोंढे बु. ग्रामपंचायत कार्यालयासाठी भूदान केले आहे. या वेळी साकुर्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अरुण अधिकारी, डोळखांबचे माजी उपसरपंच सागर देशमुख, गुरुनाथ रसाळ, ज्ञानेश्वर तिवार, सुनील सांबरे, प्रकाश देशमुख, रानोजी अधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.