पेण शहराला दहा कोटींचा निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेण शहराला दहा कोटींचा निधी मंजूर
पेण शहराला दहा कोटींचा निधी मंजूर

पेण शहराला दहा कोटींचा निधी मंजूर

sakal_logo
By

पेण, ता. ३१ (वार्ताहर) : पेण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रवीशेठ पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून कासार तलाव सुशोभीकरण, अत्याधुनिक विश्वेश्वर स्मशानभूमी; तसेच भोगावती नदी संवर्धन इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या अगोदर शहरातील रस्त्यांसाठीही भरीव निधी आणल्यामुळे सर्व रस्ते चकाचक झाले आहेत.
नगरपालिकेच्या हद्दीतील कासार तलाव दुरुस्ती व सुशोभीकरण यासाठी तीन कोटी रुपये, विश्वेश्वर येथील स्मशानभूमी नव्याने बांधण्यासाठी पाच कोटी, तर भोगावती नदी किनारा सुशोभीकरण व घाट बांधण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी आमदार रवीशेठ पाटील यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून निधी मंजूर झाला आहे. यामुळे पेण शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेण मतदार संघातील विकासकामांना ब्रेक लागला होता. आता युती सरकारने मागील बॅकलॉग भरून काढला असून, पेण शहराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. राज्याच्या नगरविकास खात्यांतर्गत विकासासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याने शहराला गतवैभव प्राप्त होणार आहे.
- रवीशेठ पाटील, आमदार, पेण विधानसभा मतदारसंघ