स्वप्नील पितळे यांची राज्यशिक्षक पुरस्कारासाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वप्नील पितळे यांची राज्यशिक्षक पुरस्कारासाठी निवड
स्वप्नील पितळे यांची राज्यशिक्षक पुरस्कारासाठी निवड

स्वप्नील पितळे यांची राज्यशिक्षक पुरस्कारासाठी निवड

sakal_logo
By

वाडा, ता. ३१ (बातमीदार) : दरवर्षी राज्य सरकारच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार दिला जातो. यासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार १०८ शिक्षकांची निवड यादी जाहीर केली आहे. यात वाडा तालुक्यातील म्हसवल गावचे स्वप्नील यशवंत पितळे यांची निवड झाली आहे. पितळ हे रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात विठ्ठलवाडी शाळा, केंद्र नांदगाव-कर्जत येथे सेवेत आहेत. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. राज्यात सन १९६२-६३ पासून पुरस्काराची ही योजना सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी १सप्टेंबर २०२२ ला राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. त्यानंतर या समितीने शिक्षकांचे गुणानुक्रम प्रवर्गनिहाय निवड यादी राज्य सरकारला सादर केली असून त्यानुसार पुरस्कारांची घोषणा अध्यादेशाद्वारे करण्यात आली आहे.