क्लस्टरच्या माध्यमातून दिवावासीयांना हक्काचे घर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्लस्टरच्या माध्यमातून दिवावासीयांना हक्काचे घर
क्लस्टरच्या माध्यमातून दिवावासीयांना हक्काचे घर

क्लस्टरच्या माध्यमातून दिवावासीयांना हक्काचे घर

sakal_logo
By

दिवा, ता. ३१ (बातमीदार) ः दिव्यात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. लोकांना परवडणारी घरे केवळ दिव्यातच मिळतात; परंतु त्या घरांवरही अनधिकृत हा शिक्‍का आहे. हा शिक्‍का आपल्याला कायमस्वरूपी काढायचा आहे. त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दिव्यातील नगरसेवकांवर दाखविलेला विश्वास कमी होता कामा नये. आपल्याला क्लस्टरसारख्या योजनेच्या माध्यमातून हक्काचे आणि सुरक्षित घर मिळेल, असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा महोत्सवात केले.
धर्मवीर मित्र मंडळ आणि बाळासाहेबांची शिवसेना आयोजित दिवा महोत्सव गेले पाच दिवस जल्लोषमय वातावरणात सुरू होता. कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या या महोत्सवात लोकांच्या गर्दीमुळे हा महोत्सव ऐतिसाहसिक झालेला पाहायला मिळाला. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. यावेळी अनधिकृत असलेल्या आणि वारंवार असुविधांपासून वंचित असलेल्या दिव्याबाबत प्रश्न मांडले. ते म्हणाले की, दिवा शहर हे सर्वांना सामावून घेणारे शहर आहे. दिव्यातील नागरिकांची समस्यांपासून सुटका झाली पाहिजे, या हेतूने आपले पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी काम करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.