इंधनाचा भडका यंदा तरी शमेल का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंधनाचा भडका यंदा तरी शमेल का?
इंधनाचा भडका यंदा तरी शमेल का?

इंधनाचा भडका यंदा तरी शमेल का?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः ऐन कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जनता जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने त्रस्त होती. यातच पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्या दरांचाही भडका उडाला होता. गेल्या वर्षभरात मार्च ते आतापर्यंत १६ वेळा सीएनजीच्या दरात वाढ झाली. सीएनजी सुमारे २६ रुपयांनी वाढला. पेट्रोल ९; तर डिझेल ६ रुपयांनी वाढले. त्यामुळे नव्या वर्षात तरी इंधनदराची ही आग शमेल, अशी अपेक्षा वाहतूकदारांकडून व्यक्त केली जात आहे.

देशातील वाहतूकदारांचा सर्वांत मोठा खर्च हा वाहनाच्या इंधनावर होतो. कोविडनंतर इंधनाचे दर जागतिक पातळीवर कमी झाले; मात्र भारतात तेल कंपन्यांनी कुठलेही दर त्या प्रमाणात कमी केले नाहीत. परिणामी देशातील माल, प्रवासी वाहतूकदारांसह सर्वसामान्य लोक सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे वाढते दर, टोल प्लाझाचे दर, प्रत्येक वर्षी वाढणारा इन्शुरन्समधील प्रीमियम, स्पेअर पार्ट जीएसटीमुळे अडचणीत सापडले. त्यामुळे नवीन वर्षात तरी केंद्र सरकारने जीएसटीच्या कक्षेत इंधनाचे दर घेतल्यास त्याचा वाहतूकदारांना फायदा होईल, अशी अपेक्षा राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केली आहे; तर ऑटोरिक्षा चालकांना नियमित भाडेवाढीऐवजी जुन्याच सवलतीच्या दरात सीएनजी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले आहे.
-----------