ओंदे महाविद्यालयाचे एनएसएस शिबीर उत्साहात

ओंदे महाविद्यालयाचे एनएसएस शिबीर उत्साहात

विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : ओंदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर मौजे कावळे येथे पार पडले. या कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका डॉ. चेतना पाटील यांनी शिबिरातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले की, एनएसएस शिबिरात शिस्त, व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन, कामाची आवड, व्यक्तिमत्त्व विकास या बाबी प्रामुख्याने दिसून येतात. यावेळी संचालिका डॉ. चेतना पाटील आणि प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांचा मौजे कावळे गावाच्या वतीने रमेश रडे, शिवराम मुकणे आणि संदीप भोये यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल पठाडे यांनी या शिबिरात केलेल्या कामाचा आणि उपक्रमाचा संपूर्ण अहवाल सादर केला. यावेळी केशव चौधरी, सुरेश पालवी, रमेश रडे, शिवराम मुकणे आणि संदीप भोये उपस्थित होते. या वेळी सर्व मान्यवरांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष धामोणे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com