वीज कामगारांचे आज आंदोलन

वीज कामगारांचे आज आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदाणी कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला आहे. याला वीज ग्राहक, लोकप्रतिनिधी व वीज कामगार संघटनांकडून विरोध होत आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून राज्य सरकारच्या खासगीकरण धोरणाचा निषेध करण्यासाठी उद्या (ता. २) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

अदाणी इलेक्ट्रिक कंपनीने राज्यातील महसुली दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला भांडुप परिमंडळातील तीन हजाराच्या वर अतिउच्चदाब वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या ग्राहकांचा ठाणे, नवी मुंबई, उरण, पनवेल, तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केलेला आहे. हा अशा प्रकारचा देशात पहिलाच प्रयोग होत आहे. हा परवाना देण्यात आला तर राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरित परिणाम होतील असा अंदाज आहे. याकरिता वीज उद्योगात काम करणाऱ्या सर्व ३० संघटनांनी एकत्र येऊन खासगीकरणाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व इतर जिल्ह्यांतील वीज कामगार मोर्चा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध करणार आहेत.

४ जानेवारीपासून संपावर
राज्य सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी ४ जानेवारी २०२३ पासून ७२ तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com