
पालघर जिल्ह्यात ३५ मद्यपी चालकांवर कारवाई
पालघर, ता. १ (बातमीदार) : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पालघर जिल्हा वाहतूक शाखेमार्फत ३५ मद्यपी चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यप्राशन करून काही चालत रस्त्यावर बेधडक वाहने चालवत असतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीत जिल्ह्यातून पालघर तालुक्यामध्ये २०, बोईसरमध्ये ११, डहाणूत दोन, मनोर आणि तलासरीत प्रत्येकी एक याप्रमाणे ३५ चालकांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्याप्रमाणे २७ हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.