आट्यापाट्या खेळाची कार्यशाळा व पंच परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आट्यापाट्या खेळाची कार्यशाळा व पंच परीक्षा
आट्यापाट्या खेळाची कार्यशाळा व पंच परीक्षा

आट्यापाट्या खेळाची कार्यशाळा व पंच परीक्षा

sakal_logo
By

डोंबिवली (बातमीदार) : ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनच्या माध्यमातून शनिवार ७ जानेवारीला आट्यापाट्या खेळाची कार्यशाळा व जिल्हा पंच परीक्षेचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर, आयरे रोड, डोंबिवली येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे. आट्यापाट्या हा सरकारमान्य खेळ असून, शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागांतील शाळा, महाविद्यालयांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना संलग्नता देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आट्यापाट्या खेळाचा प्रसार होण्यासाठी सर्व तालुक्यांमधील संघटक व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे. आट्यापाट्या खेळ जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनच्या माध्यमातून कार्यशाळा व जिल्हा पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी १८ वर्षे पूर्ण असलेल्या व आट्यापाट्या खेळात रुची असणाऱ्या क्रीडा कार्यकर्त्यांनी ९०२२५६१६८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कार्यवाह संजय काळे यांनी सांगितले.