Mon, Feb 6, 2023

सुभेदार कट्टाच्या वतीने सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन
सुभेदार कट्टाच्या वतीने सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन
Published on : 2 January 2023, 10:06 am
कल्याण, ता. २ (बातमीदार) दरवर्षी सुभेदार कट्टाच्या वतीने राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या वर्षी २८ जानेवारी रोजी रथसप्तमीदिनानिमित्त राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिवसाचे आयोजन करायचे आहे. यानिमित्त शनिवारी (ता. ७) सायंकाळी कल्याण पश्चिम येथील भगवान भोईर इंग्लिश स्कूल येथे ठाणे जिल्ह्यामधील सूर्यनमस्कारप्रेमी यांची नियोजनाबाबत सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व क्रीडा शिक्षकांनी या सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.