सर्वांच्या साथीने गावचा विकास हेच ध्येय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वांच्या साथीने गावचा विकास हेच ध्येय
सर्वांच्या साथीने गावचा विकास हेच ध्येय

सर्वांच्या साथीने गावचा विकास हेच ध्येय

sakal_logo
By

पालघर, ता. ३ (बातमीदार) : सर्वांच्या साथीने गावचा विकास हेच आमचे ध्येय आहे. आपल्या प्रेमाने आणि कल्याणकारी सामाजिक कार्याने मी प्रभावित झालो असून तुमचे हे प्रेम व कार्य माझ्या कार्यकालात पथदर्शक ठरून नवीन ऊर्जा देईल, असे भावपूर्ण उद्‌गार केळवेचे सरपंच संदीप किणी यांनी काढले.
सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाने शनिवारी श्रीकालिकादेवी मंदिरात आयोजित केलेल्या मासिक सभेतील त्यांच्या छोटेखानी सत्कार समारंभात संदीप किणी बोलत होते. ते म्हणाले की, गावच्या विकासासाठी नागरिकांच्या सूचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करू. तसेच संघास स्वतःचे सभागृह उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सभाध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन किणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा प्रा. स्मिता पाटील, कार्यवाह संजय चौधरी, प्रफुल पाटील व कोषाध्यक्ष किशोर गिरी यांच्यासह सभासद उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत करताना स्मिता पाटील यांनी संघाची उद्दिष्टे आणि गेल्या आठ वर्षांतील यशस्वी वाटचालीचा मागोवा घेतला. त्यावेळी त्यांनी मासिक सभेसाठी आपले सभागृह उपलब्ध करून देणाऱ्या श्रीकालिकादेवी देवस्थानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संघाला आपली स्वतःची वास्तु नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना सरपंच आणि आम्हाला या बाबतीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. या मासिक सभेची सांगता पसायदानाने झाली.
.....
पालघर : केळवे ज्येष्ठ नागरिकाकडून सरपंच संदीप किणी यांचा सत्कार करण्यात आला.