दुभाजकातून काढलेले सिमेंट ठोकळे रस्त्यावरच

दुभाजकातून काढलेले सिमेंट ठोकळे रस्त्यावरच

कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम चारकोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य मार्गावरील दुभाजकाचे नूतनीकरण सुरू आहे. पालिकेच्‍या आर दक्षिण विभागाकडून सुरू असलेल्या या कामातील काढण्यात आलेले जुने सिमेंट ठोकळे रस्त्यावरच टाकण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. निदान नव्या वर्षात तरी दिलासा मिळावा, अशी इच्छा पदचारी व वाहनचालक व्यक्त करत आहेत.
पालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने नगरसेवक नाहीत. पालिकेकडून रस्त्यांमधील दुभाजक नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. चारकोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा मुख्य मार्ग आहे. यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक असते. सध्या दुभाजकाचे नूतनीकरण सुरू आहे. दुभाजकामधील काढण्यात आलेले जुने सिमेंट ठोकळे ठेकेदारांकडून रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आले आहेत. तीनचार दिवस उलटूनही जुने ठोकळे रस्त्यावरच पडून आहेत. या ठोकळ्यांमुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना आणि प्रवाशांना तारेवरची कसरत करत, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका अधकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ठेकेदार व कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा वाढला आहे, असे स्थानिक कार्यकर्ते प्रवीण दुबल यांनी सांगितले.

कामात निघालेले ढोकळे ठेकेदाराने उचलायला पाहिजेत. काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला असल्यास जातीने पाहणी करून मार्ग मोकळा करण्यास सांगतो.
- हर्षल जाधव, सहायक अभियंता, परीरक्षण आर/दक्षिण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com