आंबेनळी घाटातील वाहतूक आज बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेनळी घाटातील वाहतूक आज बंद
आंबेनळी घाटातील वाहतूक आज बंद

आंबेनळी घाटातील वाहतूक आज बंद

sakal_logo
By

पोलादपूर, ता. ३ (बातमीदार) : कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबेनळी घाट उद्या (ता. ४) एक दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून येथील वाहतूक बंद राहते. याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर ते पोलादपूरला जोडणाऱ्या या मार्गावरील पार फाटा ते मेटतळेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

सातारा व महाबळेश्वरकडे जाण्यासाठी आंबेनळी घाट रस्ता जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून घाट रस्त्याचे नुकसान झाले. त्यामुळे घाटातील विविध दुरुस्ती कामे करण्यात येणार असून, काही ठिकाणी पाणी जाण्यासाठी मोऱ्या टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी रस्ता खोदून पाईपही टाकण्यात येणार आहेत. दरड कोसळण्याची शक्यता आहे तिथे दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.