धारावीतील ६० फुटी रस्ता अडकला वाहतूक कोंडीत

धारावीतील ६० फुटी रस्ता अडकला वाहतूक कोंडीत

धारावी, ता. ३ (बातमीदार) : धारावीतील ६० फुटी संत कबीर मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागून राहतात. मुंबई शहर व उपनगर यांना जोडणारा दुवा म्हणून हा रस्ता ओळखला जातो. लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (सायन रुग्णालय), छोटा सायन, वाडिया रुग्णालय, के. ई. एम. रुग्णालय, नायर रुग्णालय, गांधी रुग्णालय आदी मुंबईतील महत्त्वाच्या रुग्णालयांत रुग्णवाहिकेतून पोहचण्यास हा रस्ता जवळचा आहे; मात्र रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने या रुग्णवाहिकांनाही त्‍याचा फटका बसत आहे.
धारावीतील बॉम्बे हॉटेलसमोरील सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रत्येक वाहनचालक आपले वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. त्यावर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यातच पादचारी रस्ता ओलांडत असल्यास वाहतूक कोंडीत भर पडते. अनेकदा पादचारी व वाहनचालक यांच्यात यावरून वाद होतात. वाहतूक नियंत्रण विभागाने याप्रश्नी लवकरात लवकर लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com