अंबरनाथ होणार ‘टेम्‍पल सिटी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ होणार ‘टेम्‍पल सिटी’
अंबरनाथ होणार ‘टेम्‍पल सिटी’

अंबरनाथ होणार ‘टेम्‍पल सिटी’

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) : अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिराच्या माध्यमातून शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. या हेतूने अंबरनाथ टेंपल सिटी करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यादृष्टीने हालचालींना देखील सुरुवात झाली आहे.
अंबरनाथच्या पूर्व भागात ९६० वर्षांपूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. या प्राचीन मंदिराच्या माध्यमातून मंदिरालगतचा परिसराचा विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने पूर्ण अंबरनाथ शहर सुशोभित करण्याचा आणि शहराची राष्ट्रीय स्तरावर ओळख होण्यासाठी टेंपल सिटी करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. या कामासाठी तज्‍ज्ञ प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागारांचे नगरपालिका पातळीवर नियोजन करण्याचे ठरविले आहे.
नव्‍या योजनेमधून शहरात शिवमंदिराची संकल्पना राबवणे, शिवमंदिराच्या प्राचीन वास्तुशैलीला साजेसे चौकांचे आणि रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याच्या विविधांगी कामांचा अंतर्भाव आहे. या कामासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली आहे.