विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

sakal_logo
By

मनोर, ता. ३ (बातमीदार) : चिल्हार बोईसर रस्त्यावरील लालोंढे गावच्या हद्दीतील सूर्या नदीवरील पुलाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. शक्ती कुमार राय (वय.२९) असे या कामगाराचे नाव असून तो बिहार राज्याचा रहिवासी होता. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास पुलावर काम करीत असताना कामगाराच्या हातात असलेली लोखंडी सळई पुलावरून गेलेल्या उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाल्याने कामगाराला विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराला उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.